: कुर्डूवाडी शहरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. वेगवेगळ्या दोन घटनेत अज्ञात चोरट्याने हात साफ करत रोख रकमेसह ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी रार्त्री ही घटना घडली.
पहिल्या घटनेत पुष्पा शिवाजी लोकरे (वय ५४, चौधरी वस्ती, कुर्डूवाडी)यांच्या फिर्यादीनुसार चौधरी वस्ती येथे त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तिथे उघड्यावरच त्यांनी काही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान ठेवलेले होते. यात एलईडी टीव्ही, अंदाजे किंमत१० हजार रुपये, मोबाईल किंमत ११ हजार रुपये व रोख रक्कम ९५०० असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने रात्री चोरून नेला.
दुसऱ्या घटनेत नितीन वसंत जाधव (वय ४५ रा. राधाकृष्ण नगर कुर्डूवाडी) यांची दुचाकी (एम एच ४५ ही.२७३१) ही किंमत वीस हजार रूपयांची सोमा वेल्डिंग दुकानासमोर लावून घरी गेले असता अर्ध्या तासाने पुन्हा शेतात जाण्यासाठी मोटरसायकल कडे येऊन पाहिले असता तेथे मिळून आली नाही. चोरट्याने ती मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी कुर्डूवाडी पोलिसात नोंदली आहे.
......................