टेंभुर्णी : जगतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून कर्करुग्णांना जीवन संजीवनी मिळावी 'कॅन्सरग्रस्तांसाठी जगण्याची नवी दिशा' विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उदघाटन मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ.राहुल मांजरे,नर्गिस दत्त मेमोरियल बार्शीचे कॅन्सरतज्ञ डॉ.अमित इनामदार व जगदाळेमामा हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ञ डॉ.महेश देवकते यांच्या हस्ते झाले.
डॉ.इनामदार यांनी कॅन्सर हा आजार योग्य ती काळजी घेवून,आहार व व्यायाम तसेच सकारात्मक मानसिकता ठेऊन पूर्णपणे कसे बरे होता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच मुलींना भविष्यात गर्भाशयाच्या मुख्याच्या कॅन्सर पासून दूर ठेवण्यासाठी असलेल्या लसी बद्दल माहितीही दिली.
डॉ.देवकते आणि डॉ.मांजरे यांनी अत्याधुनिक उपचारपद्धती, तसेच सकारात्मक मानसिकता यातून कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो यावर मार्गदर्शन केले. स्लाईड शो च्या माध्यमातून मनोधैर्य वाढविण्यासाठी काय करता येऊ शकते हे दाखविले.
कॅन्सर मुक्तीच्या ध्येयावर कॅन्सर फाउंडेशनच्या पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त केले.
कॅन्सर फाउंडेशनचे महेश कोठारी, डॉ.महेश खडके, संजय तोडकर, डॉ.उमेश झाडबुके,तन्वीर मुलाणी,संजय अदापुरे, मारुती भानवसे, डॉ.आनंद खडके, ओम स्वामी,आशुतोष क्षीरसागर,किरण कांबळे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष योगेश भणगे, श्रीकांत लोंढे,डॉ.विनायक गंभीरे, सुनील महामुनी,महेश कोकीळ,पारस कटारिया,गोवर्धन नेवसे,महादेव पवार आणि सोमेश्वर तोडकर यांनी परिश्रम घेतले.
---
फोटो : ०९ टेंभुंर्णी
जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वैद्यकीय तज्ज्ञ