शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सोलापूर शहरातील ९१ रस्ते होताहेत चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 1:07 PM

कामे प्रगतिपथावर: २५ कोटी विशेष निधीतून हद्दवाढला फायदा

ठळक मुद्देनिविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली पावसामुळे रस्तेकामांना अडथळाशहर व हद्दवाढ भागातील रस्त्यांची चकाकी वाढणार

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी निधीतून शहर व हद्दवाढ भागातील ९१ रस्ते चकचकीत बनविण्याच्या कामांनी वेग घेतला  आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्याप्रमाणे नियोजन करून शहर व हद्दवाढ भागातील ९१ रस्त्यांची कामे प्रस्तावित करून मनपा सभेकडे मंजुरीसाठी फाईल पाठवली होती. 

फेब्रुवारीमध्ये या कामांना मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्तेकामांना अडथळा आला तरी सूर्यप्रकाश असताना डांबरीकरणाची कामे पूर्ण केली जात आहेत. इतर वेळी रस्त्याची रुंदी वाढविणे, खडीकरण, खड्डे बुजवून रस्ता समतल करणे ही कामे पूर्ण करून घेतली जात आहेत. त्यामुळे रस्त्यांचा लूक बदलू लागला आहे.

 वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ७० टक्के हद्दवाढ व ३० टक्के शहरी भागातील आहेत. या कामांची टेंडर प्रक्रिया १७ भागात करण्यात आली. या कामांमुळे शहर व हद्दवाढ भागातील रस्त्यांची चकाकी वाढणार आहे. सध्या शहर आणि हद्दवाढ भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. जलवाहिनी, ड्रेनेजसाठी खोदाई व पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.

 रस्त्यांचे मेन्टेनन्स करण्यासाठी मनपाकडे निधी नाही. झीरो बजेटमुळे मेन्टेनन्सची कामे थांबविली होती. या योजनेतून रस्ते झाल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शिवाय नागरिकांचा त्रास वाचणार आहे. ज्या रस्त्यांचे टेंडरिंग पूर्ण झाले त्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. 

हे रस्ते होणार चकाचक- भारतीय चौक ते बाराईमाम चौक, दयानंद कॉलेज ते चिरागअली तकीया, भुलाभाई चौक, बारामोरी चौक ते शिकलगर वस्ती, इंद्रजित मेडिकल ते आसरा चौक, दावत हॉटेल चौक, डी-फॉर्मसी ते मीरानगर चौक, बॉम्बे पार्क ते सुभाषनगर, सहयोगनगर, डी-फॉर्मसी ते हायवे, मरिआई चौक ते सलगर वस्ती, गांधीनगर ते गुरुनानक चौक, अक्कलकोट रोड ते समाधाननगर, होटगी रोड इंडस्ट्रियलमधील रस्ते, श्रीशैलनगर ते दुलंगे घर, धोत्रीकर वस्ती, तांबे बोळ ते गवळी यांचे घर, सोनी बंगला ते भीमाई चौक, ढंगे रेसिडेन्सी, महालक्ष्मीनगर, लेंगरेनगर, बनशंकरीनगर, मित्रनगर, जयलक्ष्मीनगर, घोंगडे वस्तीतील रस्ते, जुना बोरामणी नाका ते दयानंद कॉलेज, गुरुवार पेठेतील रस्ते़

शुक्रवारपेठ मारुती मंदिर रस्ता, चंदनकाटा ते सागर चौक, किनारा हॉटेल ते फकिरा चौक, जुनी मिल कंपाउंडमधील डीपी रस्ता, वसंतविहार ते गिरीजानगर, वालचंद कॉलेज ते भावनाऋषी मंदिर, माधवनगर, आशानगर, सुनीलनगर, सिद्धेश्वरनगर, आदर्शनगर, गेंट्याल टॉकीज ते लोकसेवा हायस्कूल, मोहितेनगर ते विक्रीकर भवन, सोरेगाव आश्रम ते शाळा, स्वामी विवेकानंदनगर, नम्रता सोसायटी, ओम गर्जना चौक ते शिक्षक सोसायटी, प्रसादनगर, सैफुल ते रोहिणीनगर, राघवेंद्रनगर, जगदंबानगर, बॉम्बे पार्क ते रेणुकानगरी, इंडियन मॉडेल ते रेणुकानगर, हत्तुरे वस्ती मुख्य रस्ता, सुरवसेनगर, सिद्धेश्वनगर ते नई जिंदगी.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूकVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय