पंढरपूर : कारखानदारीसमोर अनेक अडचणी आहेत; परंतु त्यातून मार्ग काढू... मी आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्याचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांना सांगितले.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची सूत्रे भगीरथ भालके यांनी घेतली. त्यानंतर बुधवारी पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी कारखानदारीवर चर्चा केली. यावेळी व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांनी भालके कुटुंबांची सरकोली (ता. पंढरपूर) येथे सांत्वन भेट घेतली. यावेळी पवार यांनी आपले विठ्ठल परिवारावर लक्ष असेल सांगितले होते. त्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके यांची बिनविरोध झालेल्या निवडीतदेखील शरद पवार यांची प्रमुख भूमिका होती. तसेच शासकीय थकहमी मिळणे, साखर कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठण करणे, या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.
फोटो ओळी
विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करताना भगीरथ भालके.