सोलापूर : जिवाने रान करून व रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या मिरचीला बाजारात भाव नसल्याने वैतागलेल्या शेतकºयाने सोलापूरातील भैय्या चौकात १ क्विंटल मिरची रस्त्यांवर फेकून देऊन आपला संताप व्यक्त केला.
मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील शेतकरी प्रकाश बाबुराव म्हमाणे म्हणाले की, माझी कोरवली येथील शिवारात ३ एकर शेती आहे़ शेतमालाला भाव मिळेल या आशेने हिरव्या मिरचीची लागवड केली़ मागील तीन महिन्यांपासून या ३ एकर परिसरात रोप खरेदी करणे, औषध फवारणी, मल्चींग पेपर, ड्रीप, खत आदी खर्च केला़ याशिवाय मिरची काढण्यासाठी महिलांना दिलेला रोजगार असा एकूण एकरी ४० ते ५० हजार रूपये खर्च आला़ मात्र बाजारात विकण्यासाठी घेऊन गेलेल्या मिरचीला कवडीमोल किंमत मिळत असल्याने नाईलाजास्तव हताश होऊन वाहतुक खर्चही निघणार नसल्याने मी आपल्या शेतातील मिरची भैय्या चौकातील रस्त्यांवर फेकून लोकांना फुकट वाटली असल्याचेही प्रकाश म्हमाणे यांनी सांगितले.