नेमतवाडी येथून शेवते येथे जाणारा गावजोड रस्ता आहे. याबाबत झेडपी बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तात्रय कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता मागील काही वर्षांपासून याबाबतचा सर्व्हेच झाला नसल्याने रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग झाला नाही, तर संबंधित रस्ता एखाद्या योजनेत बसवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे कांबळे यांनी सांगितले.
वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत लोकसंख्येच्या तुलनेत येतो. शिवाय तो निधी प्रस्तावित आराखड्यानुसार खर्च केला जातो. हा रस्ता २०२०-२१च्या आराखड्यात घेतला आहे. परंतु १५व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी रितसर मान्यताच मिळाली नसल्याचे ग्रामसेवक सोमनाथ हडपे यांनी सांगितले.
पाझर तलावात पाणी; गावाचा संपर्क बंद
पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून चिखल झाल्याने प्रवासाची समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात पाझर तलाव पावसाच्या पाण्याने भरल्यास या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जाणे-येणे बंद होऊन गावाचा संपर्क तुटतो. यामुळे पाझर तलावातून पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोट :::
संबंधित रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण होत असल्याचे लक्षात आले आहे. प्रत्यक्ष स्थळपहाणी करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी
कोट :::::
मागीलवर्षी रस्त्याच्या अडचणीमुळे ६ ते ७ टन केळीचे नुकसान झाले. रस्त्याचा प्रश्न त्वरित न सुटल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
- सुधीर अमराळे, शेतकरी, नेमतवाडी