कुर्डूवाूडी नगर परिषदेची विशेष सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष समीर मुलाणी होते. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर झूम अपद्वारे ही सभा घेण्यात आली.
या सभेत शहरातील भुयारी गटारीचा पहिला टप्पा,दुसऱ्या टप्प्याचे काम, उद्यान, क्रीडांगण,ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, पाण्याची टाकी, शवदाहिनी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, वॉटर मीटर इत्यादी कामाची चर्चा होऊन सन २०२१-२२ या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. कुठलीही दरवाढ व करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प होता.
यावेळी नगर परिषदेच्या तिजोरीत प्रारंभी शिल्लक ५१ कोटी ६४ लाख ९५ हजार २८७ रुपये एवढी असून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात झालेला एकूण खर्च ५१ कोटी ६२ लाख ३३ हजार ५०० रुपये एवढा दाखवला आहे. झूम अपद्वारे झालेल्या सभेत उपनगराध्यक्ष उर्मिला बागल,नगरसेवक धनंजय डिकोळे, बबन बागल,अरुण काकडे, वनिता सातव, जनाबाई चौधरी ,अनिता साळवे ,शांता पवार, दमयंती सोनवर, नंदा वाघमारे, राधिका धायगुडे, निवृत्ती गोरे,मुख्याधिकारी समीर भूमकर ,कार्यालय अधीक्षक अतुल शिंदे,रवींद्र भांबुरे आदी उपस्थित होते.
..............