२२ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील पाणी ‘सांडपाणी’ या गोंडस शब्दाचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शेतकरी नेते आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने या विषयावर जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला होता. मात्र जलसंपदा मंत्री पाटील यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही.
यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापु मेटकरी, सहसचिव किरण भांगे, संघटक माऊली जवळेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे, बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित होते.