उजनी धरणाची निर्मिती झाली त्यावेळी त्याचे योग्य नियोजन केले होते. त्यावेळी ते बारमाही होते. त्यानंतर उजनीतील पाणी लातूर, उस्मानाबाद, नगर या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देण्यात आले. त्यामुळे ते नियोजन कोलमडून आठमाही, सहामाहीवर आले. मात्र त्यानंतरही आता पुणे, बारामती, इंदापूरमध्ये आमचे हक्काचे पाणी नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता या उजनीचे पाणी सोलापूरला मिळणे वरचेवर कमी होत आहे. त्याचा फटका पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. तो निषेधार्ह आहे. आम्ही तो पाच टीएमसी पाण्याचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहोत तसे न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव न्यायालयीन लढाई लढावी लागेल. मात्र, सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूर तालुक्याला कसल्याही परिस्थितीत उचलू दिले जाणार नसल्याचेही आवताडे यांनी सांगितले.
उजनीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:23 AM