शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पंढरीवारीसाठी साडेतीन हजार बस धावणार

By admin | Published: July 12, 2016 4:17 PM

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल साडेतीन हजार बस पंढरपुरात दाखल होणार

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 12- पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल साडेतीन हजार बस पंढरपुरात दाखल होणार असून, आषाढीनंतर भाविकांना घेऊन परतणार आहेत. त्यामुळे भाविकांबरोबर एसटी बसचाही उत्सव पंढरपुरात दिसणार आहे.आषाढी वारीच्या निमित्ताने कर्नाटक, आंध्रसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल होतात. विशेषत: आषाढी वारीतील एकादशीला चंद्रभागेतील स्नान, विठ्ठलाचे दर्शन आणि पंढरपूरच्या पावननगरीत निवास याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या दिवशी पंढरीत दहा लाखांहून अधिक वारकरी जमतात. त्यासाठी राज्याच्या एसटीच्या सहा विभागाने जादा गाड्या सोडून भाविकांची सोय केली आहे.पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी स्थानक पंढरपूर शहराच्या बाहेर हलविण्यात येणार आहे. दशमी, एकादशी व द्वादशीला पंढरपूर शहरात एकही एसटी बस सोडण्यात येणार नाही. मात्र पंढरपूर शहराच्या चार बाजूला चार स्वतंत्र व प्रशस्त एसटी स्थानक उभे केले असून, इथपर्यंत वारकऱ्यांना जावे लागणार आहे.अकलूज रस्ता अर्थात पालखी मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर यंदा पुन्हा चंद्रभागा बसस्थानक तयार करण्यात आले असून, उद्यापासून येथे पुणे विभागातील गाड्यांचे आगमन होणार आहे. त्याबरोबर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ एक बसस्थानक व सोलापूर रस्त्यावरील तीन चौकात भीमा बसस्थानक हे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. यंदा कर्नाटक, सांगली, कोल्हापूर भागाकडे जाण्यासाठी जुन्या कोर्टाजवळील बिडारी बंगला येथे आणखी एक चौथे बसस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली,कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बस पंढरपूर शहराच्या बाहेरूनच परस्पर जाऊ शकणार आहेत.भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी व एसटी बसचे वेळापत्रक तंतोतंत पाळण्यासाठी राज्यभरातून तब्बल ४५० एसटी कर्मचारी येणार असून, प्रादेशिक अभियंता, डेपो मॅनेजर्स, विभाग नियंत्रक अशा अधिकाऱ्यांची कुमकही येथे मुक्कामी असणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी वेळेवर एसटी गाड्या सोडल्या जातील, अशी आशा निर्माण झाली आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणीएस. टी. बसस्थानकावर स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी मोठे अतिक्रमण केले आहे. तब्बल सात ते आठ चौरस फुटाचे फलाटही त्यांनी गिळंकृत केल्यामुळे वारीतील गर्दी नियंत्रित होत नाही. उलट वारीत माणसांची गर्दी वाढत असल्याने येथील अतिक्रमणही वाढतच आहे.शौचालय संकुलएस. टी. बसस्थानकावरील सुलभ इंटरनॅशनल शौचालयांची अवस्था दयनीय झाली असून, महिलांसाठी स्नानगृह पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय संकुल केवळ उद्घाटनासाठी न थांबविता त्याचा वापर सुरु करण्याची मागणी होत आहे.