याबाबत दुकानचे मालक अमर तानाजी झालटे (वय २९ रा. पुरी) यांनी पांगरी पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३८०, ४६१ कलमानुसार गुन्हा नोंदला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २ जून रोजी फिर्यादी व्यवहार उरकून दुपारी दुकान बंद करून गेले होते. ३ जून रोजी सकाळी ते दुकान उघडण्यास आले असता त्याना तीनपैकी एक शटर्सचे कुलूप अर्धवट उघडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी गावातील नातेवाइकांना व पांगरी पोलिसांना बोलावून घेऊन माहिती दिली. दुकानात जाऊन पहाणी केली असता काउंटरमधील अडीच हजार रुपये, विविध कंपनीच्या १ लाख ५९ हजारांच्या सोयाबीनच्या ३२ गोण्या, तर फॅब्रिकेशनसाठी लागणारे ८ हजार ५०० रुपयांचे साहित्य असा १ लाख ६७ हजाराचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास पांगरी फौजदार प्रवीण सिरसट करत आहेत.
-----