याबाबत शेतकरी सचिन पोपट वाघमोडे (२४, रा. शेलगाव मा.) यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी भादंवि ४६१ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. यातील फिर्यादी हा शेतीव्यवसायाबरोबरच शेळीपालन व्यवसाय करत आहे. १४ जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्याने पत्र्याच्या शेडमध्ये ९ शेळ्या व ५ बोकड बांधून ठेवले होते. जेवणानंतर सर्व झोपी गेले. सकाळी पत्र्याच्या शेडचे कुलूप उचकटलेले दिसले. पाहणी करताच शेळ्या व बोकड दिसले नाहीत. त्यांनी शेजारी राहात असलेले चुलते वसंत मारकड यांना विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याही घराला बाहेरून कडी लावून गेले होते. ती कडी काढून विचारले असता रात्री लघुशंकेला उठल्यावर शेडमध्ये शेळ्या होत्या असें सांगितले. त्यानंतर त्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून ३८ हजारांच्या शेळ्या चोरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:16 AM