अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता उपोषणकर्त्यांनी प्रांताधिकारी, महावितरण, तलाठी, मंडल अधिकारी, दुय्यय निबंधक, सहाय्यक निबंधक, लघु पाटबंधारे कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडला. प्रांताधिकारी शमा पवार यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर नागरिकांनी सरकारी कार्यालयांचा मार्ग मोकळा केला. अकलूज व नातेपुते नगरपरिषद वा नगरपंचायतीला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहतील असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी याप्रसंगी दिला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य क्रांतीसिंह माने पाटील, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिग्विजय माने पाटील, पंचायत समिती सदस्या हेमलता चांडोले, सरपंच पायल मोरे, सदस्या रेश्मा गायकवाड, वैष्णवी दोरकर, रेश्मा तांबोळी, माजी सरपंच शशिकला भरते, माजी सदस्य सतीश व्होरा, प्रतिभा गायकवाड, दीपक खंडागळे, प्रद्युमन गांधी, प्रिया टकले, कविता काशीद सहभागी झाले होते. अकलूज किराणा व्यापारी संघ, रेणुकाराई गोंधळी समाज संघटना वाहन चालक मालक संघटनांनी उपोषणाला पाठिंब्याचे निवेदन दिले.
---
120721\192-img-20210712-wa0038.jpg
अकलुज येथे ठिय्या अंदोलनाप्रसंगी प्रांताधिकारी शमा पवार यांना निवेदन देताना धैर्यशील मोहिते-पाटील व अंदोलनकर्ते