सांगोला : गुरुवारी पहाटे १़३० च्या सुमारास घराच्या दक्षिण बाजूकडील बेडरुमच्या दरवाजाचा आवाज आल्याने आसबे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी उठून पाहिले असता घरातील मास्टर बेडरुममध्ये दोन अनोळखी व्यक्ती चोरी करीत होत्या. ते पाहताना त्यांनी आमच्या तोंडावर टॉर्च मारले़ मी चोऱ़़चोऱ़़ म्हणून मोठ्याने ओरडताच खिडकीचे गज वाकवून चोर पळून गेले. त्यांनी १५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती बाळासाहेब आसबे यांनी दिली.
गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बेडरुमच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत लाकडी कपाटात ठेवलेले २ लाखांचे सोन्याचे दागिने व १३ लाख रुपयांची रोकड असा एकूण सुमारे १५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सांगोला शहरातील नाथबाबा नगर येथे ही घटना घडली.
सांगोल्यातील नाथबाबा नगर येथील बाळासाहेब आसबे हे बुधवारी रात्री १० च्या सुमारास कुटुंबासमवेत जेवण झाल्यानंतर बंगल्यातील हॉलमध्ये झोपले होते. गुरुवारी पहाटे १़३० च्या सुमारास दक्षिण बाजूकडील बेडरुमच्या दरवाजाचा पत्नीला आवाज आल्याने आसबे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी उठून पाहिले असता घरातील मास्टर बेडरुममध्ये दोन अनोळखी व्यक्ती दिसल्या त्यांनी तोंडावर टॉर्च मारल्याने मी चोऱ़़ चोऱ़़ म्हणून मोठ्याने ओरडले असता गज वाकलेल्या खिडकीतून चोरटे पळून गेले.
यावेळी बाळासाहेब आसबे यांनी बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता लाकडी कपाट उघडे दिसले़ त्यातील पैसे व सोने गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी लाकडी कपाटातील ५ तोळे सोन्याच्या पाटल्या, ४ तोळे सोन्याचा लक्ष्मीहार व १३ लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी असा सुमारे १५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याबाबत बाळासाहेब आसबे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.
चोºयांचे सत्र सुरूच़़...पोलीस यंत्रणा कुचकामी- सांगोला शहर व उपनगरात चोºयांचे सत्र सुरुच असून पोलिसांची तपास यंत्रणा कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीत वासूद रोडवरील बँक अधिकारी धर्मराज बोराडे यांच्या बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी १ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली होती. त्या चोरीचा अद्याप तपास लागला नाही. तोच या परिसरात ठेकेदाराच्या घरात दुसºया चोरीची घटना घडल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे.