भगवंत सहकारी पतसंस्थेसमोर शेजारी शेजारी दोन किराणा दुकाने आहेत.
मागील काही महिन्यांपासून
एका दुकानदाराच्या दुकानात असलेल्या गोडाऊनमधून गोडे तेलाचे डबे कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी
दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. शनिवारी सकाळी दुकान उघडून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना धक्काच बसला. कारण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा शेजारी असलेला दुकानदार तेलाचे डबे चोरून नेत असलेला प्रकार दिसला.
त्यामुळे जो चोरी करत होता, त्याला व त्याच्या वडिलाला तेलाचे डबे चोरी गेलेल्या व्यापाऱ्यांनी जोरदार चोप दिला.
बघता बघता ही वार्ता बाजारात पसरली. बघ्यांची मोठी गर्दी झाली. दरम्यान,
काही जणांनी ही भांडणे सोडविली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित
घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही व्यापाऱ्यांना पोलिसांनी गाडीत बसवून पोलीस ठाण्यात
आणले. त्या ठिकाणी शहरातील काही व्यापारी, किराणा असो. चे पदाधिकारी व काही
राजकीय मंडळी जमा झाली. त्यांनी दोन्ही व्यापाऱ्यांची समजून घातली. त्यांच्यात तडजोड केली. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये ज्याची चोरी झाली
त्याने व ज्याने चोरी करून मार खाल्ला त्या दोघांनी ही फिर्याद दिली
नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. उलट आमची परस्पराबदद्दल कसलीही
तक्रार नाही, असे लेखी दिल्याचे समजते. या प्रकाराची बार्शीत आज दिवसभर चर्चा होती.
अन् दिवसभर झाली खमंग चर्चा
आपला शेजारी खडा पहारेकरी असं म्हटलं जातं, पण बार्शीत घडलेल्या या प्रकाराने अगदी विरोधाभास ठरणारी दिसून आली. हाणामारीपर्यंत गेलेले हे प्रकरण पोलीस ठाण्यातून माघार घेत झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून दोघांनीही यावर पडदा टाकला. मात्र, हा म्हणता शहरात या प्रकाराची चर्चा वा-यासारखी पसरली.