पुरी येथे आयोजित पोलीसपाटील, सरपंच, ग्रामसेवक व सुरक्षा दल सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, प्राचार्य प्रमोद गिलबिले, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे, सरपंच अमर पवार, पिंपळवाडीचे सरपंच जयश्री रमेश चौधरी, विलास लांडे उपस्थित होते.
पांगरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत २८ गावांचा समावेश असून ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत योग्यवेळी मदत पोहोचेल. गावातील ग्रामस्थांना वेळेत माहिती देण्याचे काम होणार आहे. कोणीही या यंत्रणेला माहिती देऊन मदत घेऊ शकतो. दुर्घटनेचे स्वरूप व ठिकाण कळविल्यास तातडीने मदत पोहोचविता येणार आहे. पोलीस ठाणे, ग्रामपंचायतीकडून आपल्या गावात गुन्ह्यांना आळा घालण्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
----
टोल फ्रीवरील कॉल नागरिकांना ऐकायला मिळणार
पोलीस ठाण्याच्या हद्दीत संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर १८००२७०३३६०० वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा घालणे शक्य होणार असल्याचे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे सांगितले.
----