कुरणवाडी (ता. माण, जि. सातारा) येथील नितीन लक्ष्मण आटपाडकर हे वनपरिक्षेत्र अधिकारी खरबी वन्यजीव परिक्षेत्र उमरखेड (जि. यवतमाळ) येथे नोकरी करीत आहेत. ते लग्नासाठी जवळचे व मित्राकडून उसने घेतलेले असे एकूण २ लाख ६० हजार रुपये घेऊन गुरुवारी रात्री १० च्या सुमारास नागपूर-कोल्हापूर जाणाऱ्या एमएच ४९ /बीएल ५७८६ या खासगी ट्रॅव्हल्समधून निघाले होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर शुक्रवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास सदरची ट्रॅव्हल्स हातीद (ता. सांगोला) येथील गणेश फुड फ्लाझा या हॉटेलवर चहा, नाश्ता करण्यासाठी थांबली होती.
त्यावेळी त्यांनी बॅग सीटवर ठेवून टॉयलेटसाठी खाली उतरले. फ्रेश होऊन सकाळी ८.२० च्या सुमारास परत बसमध्ये आले. त्यावेळी सीटवर ठेवलेल्या बॅगची चेन उघडी असल्याचे तर बॅगेतील २ लाख ६० हजार रुपये गायब असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी बसमध्ये व आजूबाजूला शोधाशोध केली असता पैसे मिळून आले नाहीत. याबाबत नितीन आटपाडकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.