बार्शी : नातेवाइकाच्या लग्नासाठी परळीला गेलेल्या कुटुंबाचे घर हेरून फोडले. चाेरट्यांनी रोकडसह ५२ हजारांचे दागिने पळविल्याचा प्रकार बार्शी शहरात नाईकवाडी प्लॉट परिसरात घडला.
ही घटना रविवारी पहाटे घडली. याबाबत सद्दाम हुसेन आतार (वय २९, रा.नाईकवाडी प्लॉट) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी २७ हजारांच्या पिळ्याच्या अंगठ्या, दोन अंगठ्या, बदाम , पैंजण व रोख दहा हजार व मोबाइल चोरीस गेले आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी सद्दामहुसेन हा चालक म्हणून काम करतो. तो जेवण करून झोपायला गेला होता. त्याचे आईवडील हे खाली राहतात. आईवडील हे नातेवाइकांच्या लग्नासाठी जाण्यापूर्वी २४ जुलै रोजी खालच्या घराला कुलूप लावले होते. दरम्यान, फिर्यादी हा वरच्या मजल्यावर झोपला होता. नेहमीप्रमाणे दूधवाला आला. त्यांनी आवाज दिला असता घरातील लोकांना दरवाजा उघडता आला नाही. वरून त्यांनी दूधवाल्याकडे डोकावले असता त्यांनी खाली कोणीतरी कडी लावल्याचे सांगितले. ते खाली आले आणि पाहणी करता कपाटातील साहित्य अस्तावस्थ्य पडलेले दिसले. अधिक तपास पोलीस हवालदार डुकळे करत आहेत.