याबाबत पोलिसांत १२ मे रोजी चार जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी अमित सुभाष वायचळ (रा. जावळी प्लॉट, बार्शी) व कृष्णप्रसाद ऊर्फ भैय्या महादेव इंगळे (येडशी, ता. उस्मानाबाद) यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे. आता तिसऱ्या आरोपीस अटक केली आहे. या टोळीतील फरारी चौथा आरोपी विकास ऊर्फ बप्पा काशिनाय जाधवर (रा. जावळी प्लॉट, बार्शी) याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
शहरातील महेश शामराव पवार हा नातेवाईकासाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या शोधात असताना त्याला निखिल सगरे हा ती काळाबाजारात विकत असल्याची माहिती दिली होती. सगरे यानेच ५० हजारांत दोन इंजेक्शन त्याला विकली होती.