शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारांना वटणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले होते. सीसीटीव्ही कॅमेराची गुन्हेगारांवर दहशत होती. चोरट्यांना वाटत होती की, आमच्यावर कोणीतरी नजर ठेवतेय. शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनेच पोहोचले होते. यामुळे कुणीही गुन्हा करताना दहावेळा विचार करीत होता. परंतु आता कॅमेरेच बंद झाल्याने गुन्हेगारांचे फावते आहे. देखभाल दुरुस्तीअभावी हे कॅमेरे चालेनासे झाले आहेत. आता नादुरुस्त झालेल्या कॅमेराकडे कुणी लक्षही देत नाही.
कॅमेऱ्याखालून दुचाकीची चोरी
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. परंतु चोरटे पकडण्यास पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. कोरोनाने बेजार झालेल्या नागरिकांना चोरट्यांनीही बेजार करून सोडले आहे. दोन दिवसांपूर्वी चक्क सीसीटीव्ही लावलेल्या कॅमेऱ्याखालून दुचाकी चोरून नेण्याचा प्रताप चोरट्यांनी केला आहे.
एसपींच्या संकल्पनेला गती देणे गरजेचे..
गेल्या दोन महिन्यात रोख रकमेसह सोन्याचे दागिने, दुचाकी व इतर काही ऐवज चोरून नेण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला आहे. चोरीचा डाव यशस्वी होण्यासाठी प्रसंगी नागरिकांना मारहाणही करण्याचे प्रसंग घडले आहेत. यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होण्याची आवश्यकता आहे. परंतु याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय पोलीस प्रशासनाकडून या प्रकाराकडे लक्ष घालण्याच्या संदर्भात नगरपालिकेकडून विचारणा केली जात नाही. ग्रामीण भागात असलेल्या पोलीस पोस्टच्या परिसरातदेखील चोरटे सध्या शिरजोर होत आहेत. बीट अंमलदार नेमणुकीच्या ठिकाणी सक्रिय राहत नसल्याने सध्या ॲक्टिव्ह बीट अंमलदाराची नेमणूक करणे गरजेचे आहे. दरम्यान, गावोगावी सीसीटीव्ही व सायरन लावण्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेला गती देण्याची गरज आहे.
फोटो :::::::::::::::::::
शहरातील चोखामेळा चौकात बंद अवस्थेत असलेला सीसीटीव्ही.
280821\img-20210827-wa0028.jpg
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील बंद अवस्थेत असलेला सीसीटीव्ही कॅमेरा