सोलापूर : नियमाप्रमाणे कर..व्यवसायाप्रमाणे टॅक्स (जीएसटी).. ठरल्याप्रमाणे दर महिन्याला भाडे देऊनही सोलापूर महापालिकेकडून नवीपेठेतील व्यापाºयांसह येथे काम करणाºया कामगारांना मूलभूत सेवासुविधा मिळत नाहीत. ना स्वच्छतागृह.. ना पिण्याच्या पाण्याची सोय अशा एक ना अनेक सेवासुविधांपासून नवीपेठेतील व्यापारी गेल्या कित्येक वर्षांपासून वंचितच आहेत. महापालिकेकडून नळाची अथवा पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीच सोय नसल्याने ९९ टक्के व्यापारी जारचे पाणी विकत घेऊनच कामगारांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तहान भागवित असल्याचे चित्र दिसत आहे.
सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेली प्रमुख बाजारपेठ म्हणून नवीपेठेची ओळख काही नवीन नाही. नवीपेठेत साधारण: ४०० ते ५०० छोटी-मोठी दुकाने आहेत़ यात महापालिकेच्या मालकीचे लालबहादूर शास्त्री शॉपिंग सेंटर, जनता शॉपिंग सेंटर, खोकेधारक संघटना व पारस इस्टेट हे चार शॉपिंग सेंटर आहेत़ यात साधारणत: १०० ते १५० व्यापारी वेगवेगळा व्यवसाय करतात़ या चार शॉपिंग सेंटरपैकी लालबहादूर शास्त्री शॉपिंग सेंटर व जनता शॉपिंग सेंटरमध्ये एकेक अशी दोन स्वच्छतागृहे आहेत़ मात्र त्यांची दुरवस्था झालेली आहे़ सातत्याने नवीपेठ व्यापारी असोसिएशनकडून महापालिकेकडे या संदर्भातील तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाºयांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे़ नवीपेठेत एक ते दोन हजार कामगार काम करतात़ या कामगारांसाठी फक्त दोनच स्वच्छतागृहे आहेत, तीही महापालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्येच आहेत़ त्यांचीही दुरवस्था सांगायला नको हेही तितकेच खरे़ त्वरीत सेवासुविधा मिळाव्यात हीच अपेक्षा़
पाण्यासाठी कामगारांची पायपीट़...- ग्रामीण भागात दुष्काळ पडला की, ग्रामस्थांची पायपीट होते हे आजपर्यंत ऐकले अन् पाहिले आहे़ मात्र शहराच्या मध्यभागी असलेल्या नवीपेठेसारख्या प्रमुख बाजारपेठेत पाण्यासाठी कामगारांना पायपीट करावी लागतेय, हे काही नवीन नाही़ रस्ता खराब असल्याने उडणाºया धुळीमुळे दुकानात मोठ्या प्रमाणात माती पसरते़ दुकान धुण्याबरोबरच कामगारांना पिण्यासाठी हवे असलेल्या पाण्यासाठी कामगारांना मोठी कसरत करावी लागते़ दरम्यान, व्यावसायिकांनी जारच्या पाण्यातून कामगारांची तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केलाय़ पण हे किती दिवस चालणार हेही तितकेच खरे़ पाण्याची सोय महापालिकेने करावी, असाही सूर व्यापारी वर्गातून दिसून येत आहे.
या आहेत मागण्या़...
- - पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे
- - नवीपेठेत सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी
- - दुर्गंधीयुक्त असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी
- - पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेने व्यापाºयांना नळ कनेक्शन द्यावे
- - स्वच्छतेसाठी महापालिकेने कर्मचाºयांची नियुक्ती करावी
मुलींसह महिला कामगारांची होतेय अडचण़...- नवीपेठ या मुख्य बाजारपेठेत साधारणपणे ४०० ते ५०० दुकाने आहेत़ यापैकी २०० ते २५० दुकानात मुली, महिला या कामगार आहेत़ सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत काम करतात़ या नवीपेठेत महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नसल्याने या मुली व महिलांची मोठी अडचण होते़ याबाबत नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने सातत्याने स्वच्छतागृह उभारणी करावी, या मागणीसाठी पाठपुरावा करूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याची खंत असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली़ महिलांसाठी एकही स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिला व मुलींनी महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे़
जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?- महापालिका आयुक्त दीपक तावरे हे ट्रेनिंगसाठी गेल्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदाचा भार सध्या जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याकडे आहे़ नवीपेठेतील व्यापाºयांनी सातत्याने महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांकडे मूलभूत सेवासुविधांबरोबरच विविध अडीअडचणीची सोडवणूक करावी, अशी मागणी केली आहे़ मात्र करू..सांगतो.. करून घेतो़़़या व्यतिरिक्त कोणतेच उत्तर व्यापाºयांच्या शिष्टमंडळाला मिळाले नाही़ जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत़ हे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नवीपेठेतील समस्यांची सोडवणूक करतील काय, ते लक्ष देतील काय, अशी अपेक्षा व्यापारी असोसिएशनने व्यक्त केली़
नवीपेठेत गेल्या अनेक वर्षापासून समस्यांची बोंबच आहे़ त्यात पाणी, स्वच्छतागृह याबाबतच्या समस्येचे विचारूच नये अशी अवस्था आहे़ शिवाय प्लॅस्टिक बंद अद्यापही नवीपेठेत झाली नाही, ती व्हावी, पाणी वेळेवर सोडावे, महापालिकेने नवीपेठच्या व्यापाºयांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे़- भरत छेडा, व्यावसायिक
नवीपेठ मागील काही वर्षापासून समस्यांचे केंद्र बनले आहेत़ व्यापाºयांसह कामगारांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे़ दैनंदिन गरज असलेले स्वच्छतागृह, पाणी यासह आदी मुलभूत गरजा महापालिका प्रशासन भागवू शकत नाही ही शोकांतिका आहे़ महापालिकेने वेळीच लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात़-किरण सुरतवाला, व्यापारी