- शहाजी फुरडे - पाटील
सोलापूर : आषाढी एकादशीच्या महापूजासाठी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान यंदा अहमदनगर नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब काळे व मंगल काळे या दाम्पत्याला मिळाला आहे. हा मान मिळाल्याने दांपत्य गहिवरून आले.
आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी ते सकाळी सहा वाजता रांगेत उभा राहिले होते. गेल्या तीस वर्षांपासून कोरोना चा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता जोडीने वारी करतात. असा महापूजेचा मान मिळेल असे कधी वाटले नव्हते. हे सर्व कर्ता करविता तो पांडुरंग आहे. आज आमच्या जीवनाचे सार्थक झाले,आम्ही धन्य झालो. आम्हाला दोन मुले अन् दोन मुली आहेत. आमच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून लहान थोर एकादशी चा उपवास करतात. आम्ही देवगड संस्थांनच्या दिंडीतून पायी वारी करतो असे मानाच्या वारकऱ्यांनी सांगितले.