सोलापूर : घराघरातील आनंद द्विगुणीत करून सोडणारी अक्षया तृतीया शनिवारी असून दागिन्यांंचा अनमोल ठेवा जपणाऱ्या गृहिणींचा आनंद वाढवण्यासाठी सराफ बाजारात साऊथ इंडियन ज्वेलरी दाखल झाले आहेत. त्यापैकी नथ, बाळी आणि मोरणी प्रकार यंदा गृहिणींचे आकर्षण ठरणार आहेत. दुसरीकडे दरवाढीचा परिणाम म्हणून लग्नसराईची बुकींग मात्र अद्याप झालेली नसल्याचे सराफ व्यवसायिकांनी सांगितले.
अक्षय तृतीयेनिमित्त सराफ बाजारात आठवडाभरापासून दागिन्यांच्या व्हरायटीची चौकशी होत आहे. यंदा सराफ बाजारात साऊथ इंडियन दागिन्यांचे आगमन झाले आहे. टेम्पल नेकलेस, टॉप्स जुबे, खडे मोत्यांचे फॅन्सी टॉप्स, खडे मोत्यांचे नथ, बाळी, उंकी अँटीक रिंग असे दागिने प्रकार पहायला मिळणार आहेत. याशिवाय पुरुष वर्गाचे आकर्षण आजही पिळ्याच्या अंगठ्या आणि चेनकडे आहे.तसेच युवा वर्गासाठी ब्रेलसेट, चेन तर फॅन्सी पैंजन, छोटा नेकलेस या दोन व्हरायटी युवतींना खेचून आणणार आहे.
चार महिन्यात दर ८ हजारांनी वाढला चार महिन्यात सोन्याचा दर सात ते आठ हजारांनी वाढला आहे. मार्च महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवसीही २४ कॅरेट सोन्याचा दर ६० हजारांवर स्थिरावला होता. त्यावर जीएसटी १८०० रुपये लागते. गुढीपाडव्यानंतर सोन्याच्या दरात चक्क ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.
गुरुवारचा दरसोने : २२ कॅरेट - ५६,६०० रुपये२४ कॅरेट - ६०,९०० रुपये
सोन्याचे दर कमी होतील असे अनेक ग्राहकांना वाटत आहे. त्यामुळे यंदा अक्षय तृतीयेला लग्नसराईतील खरेदीची बुकींग फारशी नाही. चौकशी मात्र होतेय. सध्या अस्थिर वातारवणाचा मोठा फटका गोल्ड बाजारला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मंदी येईल असे व्यापार क्षेत्रातून बोलले जात आहे. त्यामुळे दर फार काही कमी होणार नाहीत.- रोहीत बिटला सराफ व्यवसायिक