अलिशान गाडीतून सफर करण्यासाठी व प्रतिष्ठा म्हणूनही ग्रामीण भागात महागड्या गाड्या घेण्याची हौस अनेकांना असते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या तरुणांनी स्वतःजवळ असलेल्या चारचाकी गाड्या गावातील गरजू रुग्णांना दवाखान्यापर्यंत ने-आण करण्यासाठी वापर करीत मदतीचा हात दिला आहे.
लॉकडाऊनमुळे दवाखान्यात ये-जा करण्यासाठी वाहने मिळत नाहीत. ॲम्ब्युलन्स परवडत नाही. कोव्हिड संसर्गामुळे मदतीला कुणी पुढे येत नाही अशा अडचणीत या दोन तरुणांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर स्वतः सेवा देणे सुरू केले आहे. आजपर्यंत शेकडो रुग्णांना त्यांनी सेवा दिली आहे.
महामारीत आपल्या लोकांना मदत नाही झाली तर आपल्या गाड्या काय कामाच्या असे म्हणत आम्ही मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स या गोष्टीबरोबर आवश्यकता भासल्यास पीपीई कीट वापरून लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
रुग्णांमध्ये निर्माण होतोय आत्मविश्वास
या मदतीबरोबरच लोकांना विश्वास देऊन दवाखान्यापर्यंत पोहोचविणे, ॲडमिट करणे, डॉक्टरांशी संवाद करणे, अथवा गरज असल्यास मोठ्या शहरांकडे रुग्णांना घेऊन जाणे, अशा गोष्टींमुळे रुग्णांत आत्मविश्वास निर्माण होत आहे. गावागावातील तरुणांनी पुढे येऊन आपल्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याची खरी गरज असल्याचे मत ॲड. संजय माने व वैजिनाथ पालवे यांनी व्यक्त केले.
फोटो
::::::::::::::::
स्वतःची चारचाकी गाडी ॲम्ब्युलन्स म्हणून वापर करत रुग्णांची ने-आण करतानाचे छायाचित्र.