बार्शी : वाढते तापमान लक्षात घेता चिमणी दिनाचे औचित्य साधून वीरशैव लिंगायत समाज, जाणीव फाउंडेशन व वृक्ष सवर्धन समिती आणि ॲनिमल फ्रेंड्स याच्या संयुक्त विद्यमाने पक्ष्यांसाठी अन्न, पाणी व निवारा या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या सप्ताहात लिंगायत स्मशानभूमीत हजार खाद्यगृहे बनवली जात आहेत.
स्मशानभूमीतील स्व. विशवनाथ आजरी निवारा सभागृहात या उपक्रमाला सुरुवात झाली. या सप्ताहात पक्ष्यांसाठी शहराच्या विविध भागांत, पक्ष्यांसाठी सुरक्षित असलेल्या ठिकाणी १ हजार खाद्यघरे करण्यात येत आहेत. यावेळी टाकावू वस्तूपासून निवारा आणि खाद्यघरे कशी तयार करावयाची यावर कार्यशाळाही घेण्यात आली. यावेळी विलास रेणके, प्रा. रमेश आजरी, ॲड. आनंद मस्के, उमेश काळे, अभियंता गणेश वाघमारे, नागजी लांबतुरे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी जाणीव फाउंडेशनचे दीपक पाटील, संतोष मस्के, संतोष काळे, नाना मारकड, पवन खरसडे, वसंत हवालदार, राणा देशमुख, तुळशीदास मस्के, संतोष काका मस्के, किरण खंगारे, संतोष पवार, सौदागर मुळे, किशोर आकुसकर, ॲनिमल फाउंडेशनचे ऋषिकेश कापसे, बालाजी देशमुख, ललित अग्रवाल, गौरव साठे, अक्षय घोडके, निखिल अहणूक, दीपक कन्ये, शेखर देशमुख, अतुल घोडके, शशी भोसले, सौरभ गरह, वृक्ष संवर्धन समितीचे अतुल पाडे, संपतराव देशमुक्त, उमेश नलाबडे, शशी पोतदार, चारुदत्त जगताप, अजित देशमुख, उदय पोतदार, बाबासाहेब बारकुल, स्वप्निल पांडे, राहुल काळे, सुधीर वाघमारे, वीरशैव लिंगायत समाज मनीष वायकर, राहुल झाडबुके, सतीश होनराव , उमाकांत बुगडे, विवेक डोंबे, भारत ढोंगरे हे परिश्रम घेत आहेत.
----
फोटो ==