सुजल पाटील
सोलापूर : कोरोनामुळे सोशल मीडियावरून मांसाहार टाळून शाकाहार करण्याचे संदेश मोठ्या संख्येने दिले जात आहेत. परिणामत: अनेक मांसाहारी शाकाहाराकडे वळल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. अचानक मोठ्या प्रमाणावर उठाव कमी झाल्यामुळे या व्यावसायिकांनी होटगी तलावात हजारो कोंबड्यांची जिवंत पिल्ले सोडून दिली आहेत. तलावाच्या पाण्यातून बाहेर येऊन ही पिल्ले आता परिसरात फिरत आहेत.
चीनमधून रूग्णांव्दारे आलेल्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोशल मीडियावर मांसाहारामुळे कोरोना होत असलेल्या अफवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील बॉयलर पोल्ट्रीचे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यामुळे व्यावसायिकांनी बुधवारी रात्री आयशर टेम्पोमध्ये भरून कोंबड्याची पिल्ले होटगी तलावाजवळ आणली ती पाण्यात फेकून दिली. दिवसभरात ही पिल्ले पाण्याबाहेर आली अन् परिसरात वावरू लागली. यामुळे या परिसरातून जाणाºया मार्गस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. शिवाय शेकडो कोंबड्या मृत पावल्याचे गुरुवारी पाहावयास मिळाले़ यातील बºयाच मृत कोंबड्या परिसरातील शिकारी पक्षी चोंच मारून खात असल्याचेही पाहावयास मिळाले़ एवढेच नव्हे तर भटक्या कुत्र्यांचाही वावर या भागात वाढला होता़ गुरुवारी दिवसभर उन्हात या कोंबड्या काटेरी झुडपातील सावलीचा आधार घेतल्याचे दिसून आले तर काही कोंबड्या लांबच्या लांब फिरत असल्याचे दिसले़
शेकडो कोंबड्या मृत- कोरोनाच्या धास्तीने होटगी तलाव परिसरात सोडलेल्या हजारो कोंबड्यापैकी शेकडो कोंबड्या मृत पावल्याचे गुरुवारी पाहावयास मिळाले़ यातील बºयाच मृत कोंबड्यांना पक्षी टोचा मारून कोंबड्यांचे मांस खात असल्याचेही पाहावयास मिळाले़ एवढेच नव्हे तर भटक्या कुत्र्यांचाही वावर या भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता़ गुरुवारी दिवसभर उन्हात या कोंबड्या काटेरी झुडपातील सावलीचा आधार घेतल्याचे दिसून आले तर काही कोंबड्या लांबच्या लांब फिरत असल्याचे दिसले़
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संदेशामुळेच कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला आहे़ सांभाळ करण्यासाठी खर्च जास्त अन् विक्री कमी भावात होत असल्याने कोंबडी पालन करणे शक्य नाही़ त्यामुळे काही लोक फेकून देण्याचा निर्णय घेत आहेत़- वेंकटराव, पोट्री व्यावसायिक, बाणेगाव