शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सोलापूरातील भीमा पाटबंधारे कार्यालयात शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 2:23 PM

कुरूल वितरिकेच्या २३ नं. फाट्याला पाणी सोडण्याची मागणी, अधिकाºयांची उडवाउडवीची उत्तरे

ठळक मुद्देउजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडलेमंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाहीशेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला

सोलापूर : कुरूल वितरिकेच्या २३ नंबर फाट्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंद्रुप येथील शेतकºयांनी बुधवारी दिवसभर होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या भीमा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या मारला तरी शेतकºयांच्या मागणीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष केले.

उजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडले आहे. मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने हे पाणी बंद करण्यात आले. यात मंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाही. याबाबत संबंधित शेतकºयांनी पाटकºयास विनंती केली तरी त्याने उद्धटपणे उत्तरे देऊन पाणी बंद केले. त्यामुळे संतापलेले शेतकरी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. शिवानंद झळके, शेतकरी संघटनेचे मेहमूद पटेल, बिळेणसिद्ध सुंटे, पंचायत समिती सदस्य अमृत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा कार्यालयात जमा झाले. या शेतकºयांनी कार्यकारी अभियंता जोशी यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

त्यावर जोशी यांनी या शेतकºयांना जलसंपदा कार्यालय क्र. २ मधील कार्यकारी अभियंता हरसूर यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे हे सर्व शेतकरी होटगी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालय क्र. २ मध्ये आले, पण कार्यालयात हरसूर नव्हते.  भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर त्यांनी या खेपेस पाणी सोडणे शक्य नाही, पुढील पाळीस विचार करू, असे उत्तर दिले. त्यावर संबंधित शेतकºयांनी तुम्ही कार्यालयात या आपण चर्चा करू अशी विनंती केल्यावर येतो, असे त्यांनी उत्तर दिले. त्यांची वाट पाहत बुधवार रात्री उशिरापर्यंत शेतकरी कार्यालयात ठाण मांडून होते. 

कर्मचारी कार्यालय बंद करून गेले तरी हे शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. कार्यकारी अभियंता   हरसूर यांनी येऊन निवेदन स्वीकारावे असा त्यांचा हट्ट होता. याची  माहिती मिळाल्यावर विजापूरनाका पोलिसांनी तेथे धाव घेतली.  त्यावेळी शेतकºयांनी निवेदन घेण्यास कोणी आले नसल्याची तक्रार केली. शेवटी पोलिसांनी समजूत काढून रात्री उशिरा त्यांना सोडून दिले. 

शेतकरी संतप्त.......कैफियत ऐकून घेण्यास कोणीच तयार नाही व निवेदन कोणी घेत नाही, असे पाहून शेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला. कोण म्हणतंय देत नाही, पाणी आमच्या हक्काचे, उजनीचे पाणी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, अशी घोषणाबाजी केली. पण शेतकºयांच्या व्यथेकडे कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही. जलसंपदाच्या अधिकाºयांच्या आडमुठे भूमिकेविषयी शेतकरी सुकुमार साठे, संतोष साठे, रोहित हजारे यांनी तीव्र भावना मांडल्या.

अधीक्षकांचेही दुर्लक्ष- जलसंपदा कार्यालयात शेतकरी ठाण मांडून बसल्यावरही अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पाटबंधारे अधीक्षक शिवाजी चौगुले यांना याबाबत लक्ष घालण्याबाबत सांगतो असा निरोप दिला पण पाटबंधारे कार्यालयाकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूक