भाळवणीतील एकाची कर्ज देतो म्हणून १ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाली अन् त्याने पोलिसांत तक्रार दिली. काही दिवसांतच याप्रकरणी मलबार हिल (मुंबई) येथून आसीफ मोहम्मद युनूस खान (२४, रा. बहादिन मुहल्ला, हापूर, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. आता धागा सापडला आहे, टोळी शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले.
सतीश जालिंदर पिसे (वय ४०,भाळवणी ता. पंढरपूर) यांना विजय सिंग यांनी ५ सप्टेंबर ते १२ डिसेंबर २०२० पर्यंत ९५४०९८३४९२ या नंबर वरून बोलून मुद्रा फायनान्सचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून दिले. तसेच सिंग याने फोन पेद्वारे टप्प्याटप्प्याने १ लाख ४८ हजार ९०० रुपये घेतले, अशी तक्रार सतीश पिसे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी आसीफ मोहम्मद युनूस खान यास मुंबईतून ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले.
या गुन्ह्यामध्ये अनेक किती जण सहभागी आहेत, याचा शोध घेत असल्याचे पो. नि. प्रशांत भस्मे यांनी सांगितले.