याबाबत महावितरण बार्शी ग्रामीण विभागाचे प्रधान तंत्रज्ञ रामचंद्र मधुकर नेदाने (३८,रा. कासारवाडी रोड) यांनी फिर्याद देताच पोलिसांनी बाबासाहेब भागवत गव्हाणे (रा. खांडवी) याच्या विरुध्द भादंवि ३५३, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
यातील फिर्यादीकडे तालुक्यातील १५ गावांतील लाईन दुरुस्ती देखभाल करण्याचे काम आहे. त्यात खांडवी गाव असून, त्यांना अभियंता झिंगाडे यांच्या आदेशानुसार वीजबिल वसुलीसाठी व वीज चोरी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी सोबत कुणाल नांदेकर व कृष्णा शिंदे यांना घेऊन पाठविले होते. बाबासाहेब गव्हाणे यांच्या घरासमोर जाताच घरगुती वीज चोरीचा आकडा दिसताच केबल काढून जप्त केली. त्यामुळे गव्हाणे यांनी माझी केबल का काढली असे ओरडत शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत .