बार्शी : खांडवी येथून दुचाकीवरून बार्शी शहरात बाळेस्वर नाक्याजवळ मित्रांसोबत आलेले बापू हनुमंत शेंडगे यांच्यावर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी तीन आरोपींची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. आर. एस. पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. प्रदीप भागवत बोराडे, सुनील अनिल राऊत, विशाल दिलीप जाधव अशी निर्दोष मुक्त झालेल्यांची नावे आहेत. १४ मे २०१९ रोजी ही खुनाची घटना शहरातील बाळेश्वर नाक्याजवळ घडली. मृत बापू शेंडगे हा मित्र योगेश भारत भाकरे याच्यासह खांडवी येथून बँकेच्या कामासाठी दुचाकीवरून घटनास्थळी येताच त्याच्या वाहनातील पेट्रोल संपले. मागून येणाऱ्या स्कूटीधारकास अडचण येताच प्रदीप बोराडे हा मृत बापू शेंडगे यास शिवीगाळ करून बघून घेतो असे म्हणाला. पुन्हा त्याने मागे येऊन शेंडगे याच्या पोटात गुप्ती खुपसली. त्याचा जोडीदार भाकरे याच्यावरही हल्ला झाला होता. यातील शेंडगे याच्यावर उपचार चालू असताना तो मरण पावला. आरोपीच्या वतीने ॲड. महेश जगताप, ॲड. अविनाश गायकवाड व ॲड. किशोर करडे यांनी काम पाहिले.
खून प्रकरणात तिघेजण निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:19 AM