ही घटना शनिवारी रात्री होऊन याबाबत पोलीस वैभव भांगे यांनी बार्शी तालुका पोलिसात तक्रार दिली.
११ रोजी चालक विकास नवनाथ काळे ३० व त्याचा जोडीदार अब्बास महंमद शेख ४२ दोघे रा.उंदरगाव ता. माढा यांच्या विरुद्ध भादंवि ३७९ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९ व १५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सगरे व पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण हे या दिवशी कोरोनाच्या पार्शवभूमीवर पानगाव भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ट्रॅक्टर चालक या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा करून येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या पोलिसानी त्यास मालवंडी येथे अडवून महसूल विभागाच्या परवान्याबाबत व रॉयल्टीबाबत विचारताच चालकांनी नसल्याचे सांगताच पोलिसांनी ७ हजारांची १ ब्रास वाळूसह छापा टाकून ३ लाख ४९ हजारांची वाहने जप्त करून दोघांना ताब्यात घेतले.