ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 14 - जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापतीपैकी सर्वाधिक जि़प़ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीकडे तीन पंचायत समित्या आल्या असून भाजपने देखील तीन पंचायत समितीी सभापती पदे घेतली आहेत़ काँग्रेसला आणि सेनेला अवघ्या पंचायत समितीवर समाधान मानावे लागले आहे़ आघाड्यांचे तीन ठिकाणी सभापती निवडणूक आले आहेत़ पंढरपूर, द़ सोलापूर आणि उत्तर सोलापूर या ठिकाणी भाजपने आपला झेंडा लावला आहे़ माळशिरस, माढा आणि बार्शी या ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती झाले आहेत़ सागोला,मंगळवेढा आणि मोहोळ या ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे सभापती झाले तर काँग्रेस आणि सेनेला अवघ्या एका-एका सभापतीपदावर समाधान मानावे लागले़ जिल्ह्यात खूप मोठे बदला झाले असून आता ग्रामीण भागातील अनेक सत्ताकेंद्रे भाजपच्या ताब्यात आली आहेत़ सभापती आणि उपसभापतीपैकी तब्बल १० पदे महिलांच्या ताब्यात आली आहेत़ यातील माळशिरस, सांगोला,द़ सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ,उत्तर सोलापूर या सात पंचायत समितीवर महिला सभापती झाल्या आहेत़ पंचायत समिती सभापती हे जि़प़चे पदसिध्द सदस्य असतात त्यामुळे या सभापतींना जि़प़ सभेला बोलाविण्यात येते़ विविध पंचायत समितींचे निवडलेले गेलेले सभापती अन् उपसभापती आणि त्यांचा पक्ष: -माढा- विक्रमसिंह बबनराव शिंदे, राष्ट्रवादी (सभापती),बाळासाहेब तुकाराम शिंदे, राष्ट्रवादी (उपसभापती)़-माळशिरस- वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील , राष्ट्रवादी (सभापती), किशोर सुळ, राष्ट्रवादी (उपसभापती)़-बार्शी-कविता विनोद वाघमारे, राष्ट्रवादी (सभापती), अविनाश भारत मांजरे भाजप (उपसभापती)-पंढरपूर- दिनकर शंकर नाईकनवरे, भाजप (सभापती),अरुण ज्ञानोबा घोलप, भाजप (उपसभापती)-द़सोलापूर-ताराबाई शिरीष पाटील, भाजप (सभापती), संदीप अमृत टेळे, शिवसेना (उपसभापती)-उ़सोलापूर-संध्याराणी इंद्रजीत पवार भाजप (सभापती), रंजनी सभापती भडकुंबे, भाजप (उपसभापती)-मंगळवेढा- प्रदीप वसंत खांडेकर, जनहित आघाडी (सभापती), विमल सुर्यकांत पाटील जनहित आघाडी (उपसभापती)-मोहोळ-समता माणिक गावडे, भीमा आघाडी (सभापती), साधना दिनकर देशमुख, भीमा आघाडी(उपसभापती)-सांगोला- मायाक्का मायाप्पा यमगर, आघाडी (सभापती), शोभा बाबासो खटकाळे आघाडी (उपसभापती)़ -अक्कलकोट- सुरेखा मल्लिकार्जून काटगाव , काँग्रेस (सभापती)़ प्रकाश मल्लिकार्जून हिप्परगी अपक्ष (उपसभापती)-करमाळा- शेखर सुब्राव गाडे, शिवसेना (सभापती), गहिनीनाथ चंद्रसेन ननवरे, शिवसेना (उपसभापती)
सोलापूर जिल्ह्यात भाजप,राष्ट्रवादी प्रत्येकी तीन सभापतीपदे
By admin | Published: March 14, 2017 8:09 PM