बार्शी : अपघातातील गंभीर जखमींवर उपचार सुरू असताना तीन बालकांचे निधन
बार्शी : वांगरवाडी जवळ मंगळवारी झालेल्या छोटा हत्ती-ट्रक अपघातातील जखमी तीन मुलांचा बुधवारी रात्री उपचार सुरु असताना उस्मानाबाद येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
पूनम पवार (वय ४), नीलम पवार (वय ७), शिराऊ पवार (वय ४, सर्व रा. पारधी कॅम्प, सोलापूर रोड, बार्शी)
असे मरण पावलेल्या तीन मुलांची नावे आहेत.
मंगळवारी झालेल्या अपघातात छोटा हत्तीचा चालक आशिष सातारकर व त्याचा साथीदार गणेश काळे हे दोघे जागीच मरण पावले. अपघातातील छोटा हत्ती हा कुर्डूवाडीहून बार्शीकडे येत होता. पराग हॉटेल जवळ सायंकाळी कुर्डूवाडीकडे निघालेल्या ट्रकची धडक बसली. या अपघातात तीन बालकासह ९ जण जखमी झाले होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर जखमीतील दोन बालकांना उस्मानाबादच्या ग्रामीण रुग्णालयात तर एकावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.