शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख वीज ग्राहकांकडे ४६ कोटींची थकबाकी

By appasaheb.patil | Published: August 24, 2019 10:30 AM

महावितरण : वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू

ठळक मुद्देवीजबिल भरण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या सोयथकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून आता नियमाप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आलीवीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटचा तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे़ थकबाकीचा वाढता आलेख पाहता महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

महावितरणकडून सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीमची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मीटर रीडिंगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व वीज ग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. तसेच वीज बिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीजबिल भरण्याची मुदत आदींची माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविली जात आहे. सोबत छापील वीजबिलसुद्धा वेळेत पाठविण्यात येत आहे. 

याशिवाय एसएमएसद्वारे वीजबिल भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश पाठविला जात आहे. त्यामुळे बिलिंगमधील तक्रारींचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत अतिशय कमी झाले आहे. वीजबिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील एसएमएसद्वारे दिली जात आहे. 

वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या सोय आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील २ लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून आता नियमाप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली आहे.

डिजिटल पेमेंटचा लाभ घ्या...- चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटचा तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

असा आहे मंडलनिहाय थकबाकीचा आलेखविभाग        ग्राहक        थकबाकीअकलूज विभाग    २७ हजार ३५५    ३ कोटी ६२ लाखबार्शी विभाग    ६१ हजार २४५    ९ कोटी ७६ लाखपंढरपूर विभाग    ६५ हजार ३५५    ९ कोटी ८१ लाखसोलापूर शहर विभाग    ६३ हजार २७५    ११ कोटी ६२ लाखसोलापूर ग्रामीण विभाग    ७० हजार ४१५    ११ कोटी ३६ लाख

सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार ६५० वीज ग्राहकांकडे ४६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे़ वारंवार आवाहन करून तसेच नोटीस पाठवूनदेखील थकबाकी भरली जात नसल्याने नियमाप्रमाणे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणकडून होणारी कारवाई टाळावी़- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल़

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणBaramatiबारामती