बीबीदारफळ या गावात महिन्यात ३० व्यक्ती कोरोना, कोरोनाची धास्ती व हदयविकाराच्या धक्क्याने दगावले आहेत.
सोमवारी सात व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी तीन व्यक्ती कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल्या. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात जवळपास १०० व्यक्ती कोरोना बाधित झाल्या व यापैकी अनेकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने तपासणी व लसीकरण सुरू ठेवले असले तरी १,६०० कुटुंब असलेल्या गावात सर्वेक्षण, सॅनिटायझर, मास्क वाटप केले नाही. त्यामुळेच वरचेवर कोरोना बाधित वाढत आहेत.
मंगळवारी तालुक्यात नव्याने ४४ कोरोना बाधित वाढल्याने एकूण बाधित १,५४१ झाले आहेत.
------
वडाळा, कळमण, नान्नज, बीबीदारफळ, मार्डी व कवठे येथे गाव तिथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगळवारी बैठका झाल्या. कर्मचाऱ्यांनी पथके तयार करुन घरोघरी सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- महादेव बेळळे
गटविकास अधिकारी
----