याबाबत उपविभागीय पोलीस कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल महेश माने यांनी तालुका पोलिसात शेतकरी सतीश किसन गरदडे (रा. वानेवाडी) व ट्रॅक्टर चालक दत्तात्रय अशोक पाटील (रा. पाथरी, ता. बार्शी) यांच्या विरुद्ध भादंवि ३७९ व पर्यावरण कायदा कलम ९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
वानेवाडी येथील सतीश गरदडे यांच्या शेतात वाळूने भरलेला ट्रॅक्टर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबर मुकुंद माळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा एमएच १३ बीजे ८८६४ हा ट्रॅक्टर वाळूने भरलेला दिसला. याबाबत चालकास शासकीय रॉयल्टी व वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता तो नसल्याचे सांगताच व वाळू कोठून आणली, असे विचारताच चालकाने सतीश गरदडे यांच्या शेतजमिनीच्या खाणीतून आणल्याचे सांगितले. तेव्हा वाळूसह ट्रॅक्टर असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्या दाेघांस ताब्यात घेतले.