सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडीचे ग्रामसेवक एस़ पी़ धडे यांच्यासह तिघांना निलंबित केले असल्याची माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली़ रोहयो आणि जलसंधारण खात्याचे प्रधान सचिव व्ही़ गिरीराज यांनी १० दिवसांपूर्वी केलेल्या पाहणीत त्या गावात बोगस मजूर रोहयो कामावर आढळल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली़ ग्रामसेवकांवर गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली असून, तांत्रिक अधिकारी अस्लम शेख व रोजगार सेवक विश्वनाथ दोड्याळ यांनाही निलंबित केले आहे़ चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम या गावात रोहयोतून घेणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले़ रोजगार हमी योजनेतून चपळगाववाडी येथील रस्त्याच्या कामांवर काम करणारे २४ मजूर होते; मात्र मस्टरमध्ये भलतीच नावे असल्याचा गंभीर प्रकार रोहयोचे प्रधान सचिव व्ही़ गिरीराज यांना पाहणीच्या वेळी आढळून आला होता़ या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा, आपण कठोर कारवाई करु, असा इशारा गिरीराज यांनी दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली़ अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडीत रस्त्याच्या कामाची त्यांनी कामांची पाहणी केली़ रस्त्याचे काम सुरू होते, २४ मजूर कार्यरत होते; मात्र मस्टरची तपासणी केली असता त्यामध्ये वेगळीच नावे आढळून आली होती. यातून तिघांवर कारवाई केली आहे़
चपळगाववाडीच्या ग्रामसेवकासह तिघे निलंबित
By admin | Published: July 16, 2014 12:46 AM