सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदार अजित पवारांच्या बाजूने; यशवंत माने यांची शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती
By राकेश कदम | Updated: July 2, 2023 17:29 IST2023-07-02T17:28:42+5:302023-07-02T17:29:19+5:30
राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदार अजित पवारांच्या बाजूने; यशवंत माने यांची शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती
सोलापूर: जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.
राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमास मोहोळचे आमदार यशवंत माने उपस्थित होते. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि संजयमामा शिंदे शपथविधी सुरू असताना मुंबईत पोहोचले. या तीनही आमदारांना अजित पवार यांच्या बंडाची कल्पना असल्याचे सांगण्यात आले. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहोत असे या तीनही आमदारांनी 'लोकमत'ला सांगितले.