सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाटकुलच्या त्या महिलेवर उपचार करणाºया सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयातील तीन नर्स, एक ब्रदर आणि एका महिला सफाई कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाली आहे.
सोलापुरात बुधवारी १३ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ९ महिला तर ४ पुरूष आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली. पॉझीटीव्ह आढळलेले रुग्ण पाटकुलच्या महिलेवर उपचार करणाºया एका हॉस्पीटलमधील कर्मचारी आहेत. यामध्ये तीन नर्स, एक ब्रदर आणि एका सफाई कर्मचाºयाचा समावेश आहे. ती महिला २१ एप्रिल रोजी त्या रुग्णालयात उपचारासाठी आयसीओमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर तेथून डिस्चार्ज घेऊन पंढरपूरच्या रुग्णालात दाखल झाली होती. तिथे ती प्रसूत झाल्यावर त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केल्यावर तिला सारीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिची हिस्ट्री तपासण्यात आली होती. ती महिला सोलापुरातील दोन हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार संबंधीत हॉस्पीटलमधील चार डॉक्टर व ४0 कर्मचाºयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिच्या थेट संपर्कात आलेल्या नर्स, ब्रदर व सफाई कर्मचाºयास लागण झाल्याचे बुधवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. हे कर्मचारी ताई चौक, शास्त्रीनगर, इंदिरानगर येथील रहिवाशी आहेत. या अनुषंगाने इतर दोन हॉस्पीटलमधील कर्मचाºयांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहेत.
इतर आठजण हे यापूवींच्या पॉझीटीव्ह रुग्ण व इतर संपर्कात आल्याचे दिसून येत आहे. पाच्छा पेठेतील किरणा दुकानादाराच्या घरी दूध पुरविणाºया शनिवारपेठेतील तरुणास क्वारंटाईन करण्यात आले होते. १४ दिवस पूर्ण झाले म्हणून त्याला आज घरी सोडण्यात येत होते. अशातच त्याचा आज अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे त्याला घरी न सोडताच परत नेण्यात आले. बेडरपूल येथे राहणारी ६0 वर्षीय महिला व १९ वर्षीय तरुणी आणि लष्कर येथे राहणाºया ४९ वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर याच परिसरात म्हणजे सिद्धार्थ चौकात राहणारी २७ वर्षीय महिला, मौलाली चौकाजवळील आंबेडकरनगरातील ४0 वर्षीय तर शामानगर झोपडपट्टीतील ४८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अक्कलकोटरोड एमआयडीसीतील पाटीलनगरात राहणाºया एका २३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
फिजीकल डिस्टन्स आवश्यक
कोरोना व सारीचे रुग्ण शास्त्रीनगर, मौलाली चौक, बेडरपूल, लष्कर, शनिवारपेठ, इंदिरानगर या भागात आढळून येत आहेत. या भागातील नागरिक किराणामाल व भाजी खरेदीसाठी मोठया प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. हे टाळण्यासाठी फिजीकल डिस्टन्स आवश्यक आहे. नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केले आहे.
कोरोनाचे रुग्ण झाले ८१
सोलापुरात सोमवारी १३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची संख्या आता ८१ झाली आहे. यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर ७५ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. त्याचबरोबर नाकाबंदीही कडक करण्यात आली आहे.
पोलिसांनी केली कारवाई
संचारबंदी असली तरी नागरिकांना भाजीपाला व किराणा खरेदीसाठी सकाळी ११ ते १ या काळात सवलत दिली आहे. सवलतीचा आज दुसरा दिवस असल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसून आले. तरीही नियम मोडणाºया नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये दुचाकीवर डबलसील जाताना अनेकांच्या गाड्या काढून घेण्यात आल्या तर वेळेआधी दुकान उघडणाºयांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.