बार्शी : बार्शी येथे सध्या नऊ पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर अद्याप १९ जणांचे अहवाल प्रलंबित होते. आज गुरुवारी सकाळी १९ प्रलंबित अहवालापैकी आठ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये आज सकाळी तीन पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत.
यात जामगावचे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असलेला बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात राहणारा एक पेंटर आणि उर्वरित दोघे हे जामगावचे आहेत. उक्कडगावातही एक रुग्ण आढळला आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली. शेंद्री एक निगेटिव्ह, तावरवाडी एक निगेटिव्ह, वैराग एक निगेटिव्ह, अहवाल प्राप्त झाले आहेत.
सोलापूर आजचा अहवाल दि.04/06/20 सकाळी 8.00 आजचे तपासणी अहवाल - 261पॉझिटिव्ह- 55 (पु. 38 * स्त्री-17 )निगेटिव्ह- 206आजची मृत संख्या- 0 एकूण पॉझिटिव्ह- 1135एकूण निगेटिव्ह - 6986एकुण चाचणी- 8121एकूण मृत्यू- 94एकूण बरे रूग्ण- 469
१९ प्रलंबित पैकी ८ अहवाल प्राप्त
जामगाव दोन पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह,
बार्शी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह
शेंद्री एक निगेटिव्ह,
तावरवाडी एक निगेटिव्ह,
वैराग एक निगेटिव्ह