या अपघातात दुचाकीवरील राजेंद्र निवृत्ती शेटे, अर्चना राजेंद्र शेटे या पती-पत्नीसह मुलगी नंदिनी राजेंद्र शेटे (रा. नामदेव मंदिरजवळ, कासार घाट, पंढरपूर) यांचा मृत्यू झाला, तर समृद्धी राजेंद्र शेटे व स्वरा राजेंद्र शेटे (रा. पंढरपूर), कारचालक दादासाहेब कांबळे, उमेश पाटील, दीपक दळवे (रा. सांगली) हे जखमी झाले. या अपघातात तिन्ही वाहनांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत विशाल ज्योतिराम काळे (रा. अलराइन नगर, सांगोला) यांनी फिर्यादी दिली असून, पोलिसांनी कारचालक दादासाहेब कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
अपघात इतका भीषण होता की, राजेंद्र शेटे व मुलगी नंदिनी दुचाकीसह टेम्पोखाली गेल्याने जागीच ठार झाले, तर पत्नी अर्चना, मुलगी समृद्धी व स्वरा रस्त्यावर फेकल्याने गंभीर जखमी झाल्या. कारमधील चालक दादासाहेब कांबळे, उमेश पाटील, दीपक दळवी यांनाही मार लागल्याने ते जखमी झाले. अपघातातील दुचाकीवरील जखमी अर्चना शेटे, समृद्धी शेटे, स्वरा शेटे या तिघींना सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, तिघींचीही प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता पंढरपूरला हलवले. तेथे प्राथमिक उपचार करून सोलापूरला घेऊन जाताना वाटेत अर्चनाचा मृत्यू झाला. तर समृद्धी व स्वरा शेटे या दोघी बहिणी सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.
असा घडला तिहेरी अपघात
कासारघाट-पंढरपूर येथील राजेंद्र निवृत्ती शेटे हे पत्नी अर्चना, मुली नंदिनी, समृद्धी व स्वरा यांच्याबरोबर मंगळवारी एमएच १२/डीके ४०४९ या दुचाकीवरून हणमंतगाव (ता. सांगोला) येथे आईला भेटण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी पंढरपूर-सांगोला रोडने येताना बिलेवाडी पाटीजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास पंढरपूरकडून भरधाव निघालेल्या (एमएच १०/ सीएक्स ३८१)कारचालकाने विरुद्ध बाजूने समोरून येणाऱ्या (एमएच १०/ एडब्ल्यू ७६४२) या टेम्पोला जोराची धडक दिली. यामुळे टेम्पो उजव्या बाजूला येऊन दुचाकीला धडकल्याने हा तिहेरी अपघात घडला.