माळशिरस : अकलूज-इंदापूर बायपास मार्गावर नाकाबंदी करून संशयित वाहने तपासत असताना एका जीपमध्ये तीन व्यक्तींसह मांडुळ जातीचा जिवंत साप आढळून आला. त्यांना ताब्यात घेऊन अकलूज पोलिसांनी तिघांसह साप आणि जीप वन अधिकाºयांकडे सोपविली असता वन अधिकाºयांनी त्यांची कसून चौकशी करण्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालयाकडे आरोपींना फॉरेस्ट कस्टडी देण्याची मागणी केली आहे.
बालाजी महादेव जाधव (वय २६, रा. खर्डी), हैदर बालम मुलाणी (वय २६, रा. कासेगाव, ता. पंढरपूर), सचिन प्रताप खरात (वय २४, रा. शिरभावी, ता. सांगोला) हे तिघे ५ जानेवारी रोजी रात्री १० ते पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास इंदापूरकडून (क्र. एम. एच. १४/ई.सी.२००६) जीपमधून येत होते. दरम्यान, अकलूज-इंदापूर बायपास रोडवर अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते.
तपासणीदरम्यान रात्री १.१५ वा. वरील क्रमांकाच्या जीपमध्ये चालकाच्या सीटमागे असलेल्या कव्हरमध्ये पांढºया रंगाच्या पोत्यामध्ये मांडुळ जातीचा जिवंत साप आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी याचा पंचनामा करून वरील तिघांसह जीप, चार मोबाईल आणि मांडुळ जातीचा जिवंत साप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी पुढील चौकशीसाठी वनविभागाच्या ताब्यात दिले.
वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी इरशाद अहमद म. हसनसाहेब शेख यांनी या तिघांची वन्य प्राण्यांची राष्टÑीय, आंतरराष्टÑीय बाजारपेठेमध्ये अवैध तस्करी केली जाते. यामध्ये या आरोपींचा सहभाग आहे का, त्यांच्याकडे अजून किती मांडुळ आहेत, हे मांडुळ कोठून आणले आहेत, याबाबत कोणते साहित्य वापरले, यापूर्वी त्यांनी अशी तस्करी केली होती का, याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांनी वरील तिघांना फॉरेस्ट कस्टडी मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे.