शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

चांदी नेणाऱ्या आटपाडीच्या तिघांना अटक

By admin | Published: January 20, 2015 12:20 AM

२२ लाखांची बेकायदेशीर चांदी : बेळगाव पोलिसांची कित्तूर येथे कारवाई

बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीहून तमिळनाडूमधील सेलम येथे एका कारमधून बेकायदेशीररीत्या नेण्यात येणाऱ्या ९० किलो चांदीच्या विटा बेळगाव पोलिसांनी जप्त करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील तीनजणांना अटक केली आहे. ही कारवाई कित्तूर येथे करण्यात आली. बाजारभावाने जप्त केलेल्या चांदीची किंमत २१ लाख ७० हजार रुपये आहे . भगवान भांडगर (वय ४५, रा. मायाक्कानगर, आटपाडी, जि. सांगली), सुभाष कोळेकर (३०) आणि विष्णू माळी (५३, रा. मायाक्कानगर, आटपाडी, सध्या रहिवासी तिरु नगर, स्टेट बँक कॉलनी, सेलम, तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक रवी कांते गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे संशयित आरोपी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीहून बेळगावमार्गे तमिळनाडूमधील सेलम येथे बेकादेशीररीत्या चांदी नेत होते. तमिळनाडूमधील कॉलिस गाडीतील (टी एन ४९ यु १८९२) मागच्याआणि समोरच्या सीटच्या खाली चांदीच्या विटा ठेवून सेलम येथे रविवारी (दि. १८) जात होते. त्यावेळी बेळगाव पोलिसांनी पुणे- बंगलोरराष्ट्रीय मार्गावरील कित्तूरजवळ ही गाडी अडविली त्यांना चांदीची माफक कागदपत्रे देता आली नाहीत. जप्त केलेल्या चांदीची किंमत २१ लाख ७० हजार, याशिवाय पाच लाखांची कॉलिस गाडी आणि एक लाख रुपये रोख रक्कमदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी कित्तूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.