शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

अर्ध्या तासात सोलापुरातील तीन महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 2:28 PM

चोरांचा धुमाकूळ; तिन्ही महिलांनी सांगितले चोरट्यांचे एकच वर्णन

ठळक मुद्देशहरातील गुन्ह्याची सुरूवात अशा पद्धतीने झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालीअर्ध्या तासात तीन ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागे पत्ता विचारण्याचा बहाणा करून पळवली चेन 

सोलापूर : बुधवारी सकाळी नवी पेठ, काळी मशीद अन् विजापूर रोडवरील श्रीकृष्ण द्वारकानगरीसमोर असलेल्या ग्रीलमध्ये हात घालून चोरट्यांनी मंगळसूत्र व सोन्याचे दागिने हिसका मारून पळवून नेले. शहरातील गुन्ह्याची सुरूवात बुधवारी सकाळी अशा पद्धतीने झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अर्ध्या तासात तीन ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले. 

मंगल भारत पाटील (वय-५५, रा. इरला दाऊतपूर, जि. उस्मानाबाद) या बुधवारी बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी सोलापुरात आल्या. सकाळी ९.१५ वाजता त्या मुलाचा ड्रेस बदलण्यासाठी नवी पेठ येथे गेल्या़ त्या एका साडी दुकानासामोर आल्या असता पाठीमागून मोटरसायकलवर दोन तरूण आले. दोघांनी मंगल पाटील यांना या ठिकाणी लुटमार झाली आहे, आम्ही पोलीस असून तुम्ही तुमचे दागिने पिशवीत ठेवा असे सांगितले. मंगल यांनी २७ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र काढले व पिशवीत ठेवत असताना, मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेल्या तरूणाने मंगळसूत्र व हार हिस्का मारून काढून घेतले. मंगल पाटील यांनी आरडाओरडा करताच दोघे चोरटे मोटरसायकलवरून पळून गेले. 

लता रामचंद्र कुलकर्णी (वय-७८, रा. २७/१२७ तरेकर निवास आनंद, उस्मानाबद) या पती रामचंद्र कुलकर्णी यांच्यासमवेत  जावईच्या भावाच्या मुलाचे लग्नकार्य असल्याने एस.टी.ने सोलापुरात आल्या होत्या. लग्नकार्याला वेळ असल्याने एस.टी.स्टॅन्डवरून पायी चालत भाग्यलक्ष्मी बँकेच्या दिशेने निघाल्या होत्या. सकाळी ९.३0 वाजता काळी मशीदजवळील जिजामाता सभागृहसमोरील बालाजी फोटो दुकान समोरून मोटरसायकलवरून दोन तरूण आले. मोटरसायकल चालवणाºया तरूणाने थेट गळ्यातील ६0 हजार रूपये किमतीचे गंठण हिस्का मारून काढून घेतले. लता कुलकर्णी या आरडाओरडा करताच दोघांनी तेथून धूम ठोकली. दोन्ही ठिकाणच्या चोरीप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

तिन्ही महिलांनी सांगितले चोरट्यांचे एकच वर्णन...- नवीपेठ येथील साडी दुकानासमोर, काळी मशीद येथील बालाजी फोटो स्टुडिओ आणि विजापूर रोडवरील श्रीकृष्ण द्वारकानगरी येथे तिन्ही ठिकाणी दोन चोरटे मोटरसायकलवरून आले. चोरट्यांनी गळ्यातील दागिने पळवून नेले. तिन्ही महिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये दोन चोरटे हे ३0 ते ३५ वर्षांचे होते. मोटरसायकल चालवणाºया चोरट्याच्या अंगावर निळा टी-शर्ट व राकाडी रंगाची पँट तर पाठीमागे बसलेल्या चोरट्याच्या अंगावर पांढºया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट असल्याचे वर्णन केले आहे. चोरट्यांचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे.

पत्ता विचारण्याचा बहाणा करून पळवली चेन - विजापूर रोडवरील श्रीकृष्ण द्वाराकानगरी येथे कमलाबाई पांडुरंग पाटील (वय-६९) या आपल्या घरासमोरील पोर्चमध्ये बसल्या होत्या. सकाळी ९.३0 ते ९.४५ दरम्यान मोटरसायकलवर दोन तरूण आले व डॉ. अपर्णा पाथरूडकर यांच्या दवाखान्याच्या दिशेने पुढे निघून गेले. लगेच गाडी वळवून परत कमलाबाई पाटील यांच्या घराजवळ आले. डॉ. अपर्णा यांचा दवाखाना कोठे आहे अशी विचारणा केली. कमलाबाई यांनी हात करून येथेच पाठीमागे आहे असे सांगत असताना, मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या चोरट्याने लोखंडी ग्रीलमध्ये हात घालून गळ्यातील सोन्याची चेन हिस्का मारून पळवून नेली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी