कुसळंब : बार्शी तालुक्यातील बावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू होते. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कमान कोसळून तीन मजूर जागीच ठार झाले.
बार्शी-तुळजापूर मार्गावरील बावी फाटा येथे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या कमानीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते. याठिकाणी नऊ कामगार काम करीत होते, मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक कमान अंगावर कोसळून 3 मजूर जागीच ठार झाले.महेश भारत डोळसे (वय 27, राहणार वैराग), विकास सुग्रीव वाळके (वय 35 रा. मानेगाव) आणि दीपक संभाजी घोलप (वय 32, रा. दडशिंगे) अशी त्यांची नावे आहेत.