आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : गोवा येथील विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात विक्रीस नेणाºया तीन आरोपींना दारूबंदी न्यायालयाने कलम ६५ इ, ए बॉम्बे प्रोबेशन अॅक्ट सेक्शन २५५ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. संतोष व्ही. पवार यांनी ठोठावली. अवैध दारू बाळगण्याच्या खटल्यामध्ये पुणे विभागात झालेली ही पहिलीच शिक्षा असून महाराष्टÑातील केवळ तिसरी शिक्षा आहे.२६ जुलै २०१७ रोजी पहाटे ३.१५ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथे गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा उत्पादन शुल्क अधिकाºयांनी जप्त केला होता. यामध्ये ३१० मद्याचे बॉक्स, २ आयशर, २ पिकअप व्हॅन, एक स्कॉर्पिओ, एक इनोव्हा असा एकूण ६२ लाख ६१ हजार ७२१ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सोमनाथ तुकाराम भोसले (वय ३२, रा. खवणी, ता. मोहोळ), समाधान तुकाराम भोसले (वय २९, रा. खवणी, ता. मोहोळ), अविनाश दिगंबर डोंगरे (वय २३, रा. आढेगाव, ता. मोहोळ) या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे तर पोपट मनोहर मुळे (वय ३२, रा. खंडाळी, ता. मोहोळ), अवधूत रामचंद्र माळी (वय २४, रा. शेजबाभूळगाव) या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. नितीन नरवाडकर व विद्या सचिन बनसोडे यांनी काम पाहिले. आरोपीचे वकील म्हणून अॅड. महेश जगताप, धावणे, सूर्यवंशी यांनी काम पाहिले.-------------------------पाच महिन्यात निकालच्जुलैमध्ये जप्त केलेल्या मद्यसाठ्यातील आरोपींविरुद्ध २१ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पाच महिन्यानंतर म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. पंच लक्ष्मण डोलारे यांनी सुरुवातीपासून दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.----------------यांनी केला तपासच्या खटल्यात पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, सोलापूरचे अधीक्षक रवींद्र आवळे, निरीक्षक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, राहुल बांगर, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, मलंग तांबोळी, विजय शेळके, रशीद शेख, संजय नवले, गजानन ढब्बे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी.-------------बनावट आणि बेकायदेशीर मद्यविक्री करणाºयाविरुद्ध अनेक खटले दाखल होतात, परंतु शिक्षा होत नाही. तपास अधिकारी आणि त्यांच्या टीमने योग्य दिशेने तपास केल्यामुळे ही शिक्षा झाली. यामुळे असे कृष्णकृत्य करणाºयांवर जरब बसणार आहे.- रवींद्र आवळे,अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर.----------------------केवळ दोनवेळा शिक्षाबेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाºया आरोपींना यापूर्वी महाराष्टÑात केवळ दोन खटल्यात शिक्षा झालेली आहे. विदर्भातील चिमूर आणि ठाणे जिल्ह्यातील एका प्रकरणात ही शिक्षा झाली आहे. बुधवारी सोलापूर दारूबंदी न्यायालयाने ठोठावलेली ही तिसरी शिक्षा आहे.जप्त वाहने शासन जमा करण्याचे आदेशया प्रकरणात एकूण पाच वाहने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी जप्त केली होती. यापैकी एम.एच. १३ एक्स २००१, एम.एच. १३ सीजे ९०२२ ही दोन आयशर वाहने शासन जमा करण्याचे आदेशही दारूबंदी न्यायालयाने दिले.
बेकायदेशीर मद्य बाळगणाºया आरोपींना तीन वर्षांची शिक्षा, दारूबंदी न्यायालयाचा निकाल, पुणे विभागातील पहिलीच शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:27 AM
गोवा येथील विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात विक्रीस नेणाºया तीन आरोपींना दारूबंदी न्यायालयाने कलम ६५ इ, ए बॉम्बे प्रोबेशन अॅक्ट सेक्शन २५५ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. संतोष व्ही. पवार यांनी ठोठावली.
ठळक मुद्देअवैध दारू बाळगण्याच्या खटल्यामध्ये पुणे विभागात झालेली ही पहिलीच शिक्षाउत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथे गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा उत्पादन शुल्क अधिकाºयांनी जप्त केला होता. यामध्ये ३१० मद्याचे बॉक्स, २ आयशर, २ पिकअप व्हॅन, एक स्कॉर्पिओ, एक इनोव्हा असा एकूण ६२ लाख ६१ हजार ७२१ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला होता