सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी हे १ लाख ३१ हजार मतांनी आघाडीवर आहेत़ तर माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत़ दोघांचा विजय निश्चितच मानत सहकारमंत्री सुभाष देशमुख याच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे़ सायंकाळी चार वाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांना ४ लाख ३ हजार ९००, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना २ लाख ७२ हजार ६११, वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांना १ लाख २२ हजार ९०२ मते आतापर्यंत मिळाली आहेत़ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ८ लाख १६ हजार ९१६ मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आतापर्यंत ४ लाख ४८ हजार ६८ तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना ३ लाख ८९ हजार २५० मते मिळाली आहेत. विजय निश्चित मानत रणजितसिंह निंबाळकर यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या.