सोलापूर : तेलंगी पाच्छा पेठेत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे संपूर्ण शहरासह पूर्व भाग हादरून गेला आहे. परिसरातील लोक कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत आहेत़ मिळेत त्या वस्तू आढवे लावून आपली गल्ली, मोहल्ला बंद करतानाचे चित्र सोमवारी दिवसभर पहावयास मिळाले़ काही ठिकाणी तुम्ही तुमच्या घरी राहा, आम्ही आमच्या घरी राहतो असे संदेश लिहले होते.
सोलापुरात एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह नाही या अविभार्वात बिनधास्तपणे भटकणाºया नागरिकांनी आज मात्र गल्ली बोळ बंद करून घरी राहणेच पसंद केले .जीवनावश्यक वस्तू वितरित करणारे दूध, भाजीपाला विक्रेत्यांना ही मज्जाव केले़ पोलिस सकाळपासूनच ध्वनिक्षेपकावरून घराबाहेर न पडण्याचे अवाहन करत होते .तेलंगी पाच्छा येथील ज्या ठिकाणी रुग्ण आढळुन आला त्या परिसरातील जोडबसवण्णा चौक, रविवार पेठ, दाजी पेठ, भद्रावती पेठ, न्यू पाच्छा पेठ, शांती चौक, मार्कडेय चौक, कुचन नगर, राहुल गांधी झोपडपट्टी, गिरी झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टी या सर्व वस्तीतील गल्ली बोळ मिळेल त्या साहित्यांनी बंद करण्यात आले होते. लोक भयभीत होत घरीच राहणे पसंद केले़ रस्त्यावर समशान शांतता होती. मागील पंधरा वीस दिवसांपासून गल्ली बोळात, कट्ट्यावर चर्चा करणारे, पोलीस येत आहेत का हे डोकावून पाहत गप्पात रंगणारे टोळके आज गायब झाले आहेत.
कालपर्यंत एकही रुग्ण पॉझिटीव्ह नसल्याने आम्ही सर्वजण गाफील होतो़ वस्तीतील लोकांनाही त्याचे गांभीर्य नव्हते. आज मात्र आम्ही आमची संपूर्ण वस्ती चारही बाजूने रहदारी व बाहेरून येणाºया लोकांसाठी, फेरीवाले, भाजीविक्रेते, दूधवाले यांच्यासाठी बंद केले आहे. दिवसभरात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या सेविकांशिवाय एकाही व्यक्ती स प्रवेश दिला नाही़ वस्तीतील एकही व्यक्ती बाहेर पडली नाही.- तुळजाराम कडमंची, कुंचिकोरवी झोपडपट्टी,
मार्कडेय रुग्णालयजवळील फलमारी झोपडपट्टीतील लोकांनी फळ्यांचे टेबल, लोखंडी चक्र असे मिळेल ती वस्तू लावून रहदारी बंद केले. तर भवानी पेठ येथील नागरिकांनी ट्रॉली अन फळ्याचा वापर करीत रस्ता बंद केला. विडी घरकुल येथील गोंधळीवस्तीच्या नागरिकांनी टाकाऊ कुलर व इतर प्लास्टिक च्या वस्तू ठेऊन रस्ता बंद केले होते. कोरोनामुळे घरदार सोडून कर्तव्य बजाविणाºया कविता नगर पोलिस वसाहतीतील त्यांच्या कटुंबियांनी रस्ता बंद करीत सावधानता बाळगली आहे. विडी घरकुल परिसरातील गोंधळी वस्ती ते रंगराज नगर कडे जाणारा रस्ता बांबू अन सायकलचे टायर लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. सोलापूर - हैद्राबाद महामार्गावरील गणेश नगर येथील नागरिक लोखंडी कमान, खोके, दगडे मिळेल त्या साहित्याने रस्ता बंद करताना दिसत होत़े़.