करमाळा : स्वयंपाक नीट येत नाही, मुलांना सांभाळत नाही म्हणून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहिनी अशोक मलकाकूल असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी करमाळा पोलिसांनी अशोक बबन मलकाकूल (रा. बिडकीन, ता. पैठण) या जावयाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
याप्रकरणी मुलीची आई प्रियाबाई उमाकांत आरनुरे (वय ४५ वर्षे, रा. चवंडानगर, अहमदपूर, जि. लातूर) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. २५ जानेवारी २०१५ रोजी अशोक बबन मलकाकूलसोबत मोहिनीचा विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना तेजस, शैलेश व मुलगी श्रुती अशी मुले झाली. लग्न झाल्यानंतर दोन वर्षांपासून अशोक मलकाकूल हा घरगुती कारणावरून तिच्यासोबत भांडण काढून शारीरिक, मानसिक त्रास द्यायचा.
सासुरवाडीत जाऊन ऊस वाहतूकदार यांच्यासोबत ऊस तोडणीकरिता करार करून उचल घेतली. त्यानंतर तो मोहिनीला ऊस तोडणीकरिता सोबत घेऊन जायचे आहे असे सांगून मोहिनी व श्रुती यांना तो स्वत:च्या घरी घेऊन गेला. त्यानंतर दोन- चार दिवसांनी अशोक मुलगी मोहिनी व श्रुती यांना करमाळा तालुक्यातील कुगाव येथे ऊसतोडणी टोळीसोबत ऑक्टोबर २०२० मध्ये आला होता.
त्यानंतर मानसिक शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. शिवाय घरात धान्यही भरत नव्हता. अखेर मुलीने कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.