दीपक दुपारगुडे, सोलापूर : जेऊर येथील स्वप्निल शंकर कांबळे (वय ३०) या तरुणाने डोक्यावर वाढलेला कर्जाचा बोजा व सावकाराच्या तगाज्याला कंटाळून रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी करमाळा पोलिसात नोंद झाली आहे.
स्वप्निल कांबळे हा जेऊर गावात सर्वात मिसळून राहणारा तरूण असून आठवड्याभरापासून तो एकांतातच राहत होता मिळालेल्या माहितीनुसार त्याने अनेक खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते व काही जण पैशासाठी तगादा लावत असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.